महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातर्फे आदिवासी आरोग्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाकरीता संकेतस्थळाचे उद्घाटन
इंटरनॅशनल ट्रायबल हेल्थ परिसंवादाकरीता संकेतस्थळाचे उद्घाटन
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे इंटरनॅशनल ट्रायबल हेल्थ परिसंवादाकरीता संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत प्रमुख अतिथी म्हणून एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, विद्यापीठाच्या ट्रायबल हेल्थ चेअर ऑफ एक्स्सलेन्सचे प्रध्यापक डॉ संजीव चौधरी, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील, नागपूर विभागीय केंद्राचे समन्वयक डॉ किरण टवलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठार्फे या आंतरराष्ट्रीय स्तरावर परिसंवादाचे आयोजन ऑल इंडिया इनिन्स्टूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. या परिसंवादाच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्य विषयक, शिक्षण, संशोधन आणि जागरुकता निर्माण होण्यासाठी उपयुक्त मार्ग मिळावे असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांवर आरोग्य विद्यापीठातर्फे ब्लॉसम प्रकल्प राबविण्यात आला होता.
याप्रसंगी एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ प्रशांत जोशी यांनी सांगितले, दुर्गम भागात राहत असलेल्या आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी अशा स्वरुपाच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादाची उपयुक्तता आहे. या संकेतस्थळामार्फत या विषयावर कार्य करणारा जागतिक स्तरावरील संशोधक, तज्ज्ञ अभ्यासक पोहचवणे सोपे होईल असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, कुपोषणासारख्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी अश्या प्रकारच्या चर्चासत्रांमार्फत कृती आराखाडा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरेल असे त्यांनी सांगितलेे.
विद्यापीठाच्या ट्रायबल हेल्थ चेअर ऑफ एक्स्सलेन्सचे प्राध्यापक डॉ संजीव चौधरी यांनी सांगितले की, 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 अश्या या तीन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन एम्स नागपूर येथे करण्यात आले असून संकेतस्थळावर नाव नोंदणीस कुलगुरु यांचे प्रथम नोंदणी करुन प्रारंभ करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे इंटरनॅशनल ट्रायबल हेल्थ सिम्पोझियम MUHS FIST-25 संकेतस्थळाचे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचा परिचय विद्यापीठाच्या ट्रायबल हेल्थ चेअर ऑफ एक्स्सलेन्सचे प्रध्यापक डॉ संजीव चौधरी यांनी केला.
यावेळी शैक्षणिक विभागाच्या अधिष्ठाता डॉ मृणाल पाटील यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली. आभार प्रदर्शन सहायक कुलसचिव संदीप राठोड यांनी केले. सत्यजीत तांबे यांनी या संकेतस्थळाची निर्मीती केली आहे. या कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिकारी, उपस्थित होते.