गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली स्थित नवीन परिसरात ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा शुभारंभ
लॉईड्स मेटल्स कंपनीच्या सहकार्याने सुरू होणार तंत्र शिक्षण
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली स्थित नवीन परिसर येथे लॉईड्स मेटल्स कंपनी सोबत विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था वर्ष २०२५-२६ पासून भारत सरकार व महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यतेने सुरू करण्यात आली आहे.

सदर महाविद्यालय द्वारा ३ वर्षीय अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून पहिल्या फेरी अंतर्गत दिनांक ८ जुलै ते १० जुलै २०२५ पासून दहावी उत्तीर्ण व DTE पोर्टल द्वारा नोंदणीकृत विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी आपला पर्याय भरू शकतील.
त्या करिता विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था द्वारा देऊ केलेल्या अभ्यासक्रमाचे संकेतांक पुढील प्रमाणे आहेत.
(1) Mining Engineering – 402670110U (2) Computer Science and Engineering – 402624210U (3) Manufacturing Technology – 402663010U (4) Metallurgical Engineering – 402669210U. या अनुषंगाने इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी आपला पर्याय भरावा. तसेच याबाबतीत पर्याय भरण्यासाठी गोंडवाना विद्यापीठात विद्यार्थी मदत केंद्र स्थापित करण्यात आले असून त्याचा लाभ घ्यावा असे जाहीर आव्हान प्रा मनीष उत्तरवार, प्रभारी संचालक, विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था व संचालक न न व सां, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली (संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२४६९६०९) यांनी केले आहे.
