कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
KKSU आणि MSFDA यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्याशाखा विकास कार्यक्रम
रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवोन्मेष…’ प्राचीन काळातील भारतीय शिक्षण दि ०५ऑगस्ट ते ०९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम विद्यापीठ परिसर, रामटेक येथे आयोजित केला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ४० प्राध्यापक उपस्थित होते.
गुरुकुल प्रणालीचे पुनरुज्जीवन करणे, त्याचा अवलंब करणे आणि प्राचीन शिक्षण पद्धतीच्या पैलूंची जाणीव करून देणे हे या FDP चे उद्दिष्ट आहे. पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतींच्या एकत्रीकरणातून ही सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. कुलगुरू प्रा हरेराम त्रिपाठी आणि कुलसचिव प्रा कृष्णकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रो मधुसूदन पेन्ना, समन्वयक, MSFDA हे FDP चे मार्गदर्शक आहेत. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा हरेराम त्रिपाठी, KKSU होते. विशेष निमंत्रित म्हणून प्रा प्रा कविता होले, अधिष्ठाता, संस्कृत आणि इतर भाषा विद्याशाखा आणि प्रा हरेकृष्ण अगस्ती, रामटेक परिसर संचालक हे उपस्थित होते. FDP समन्वयक प्रा पराग जोशी आणि MSFDA सहयोग समन्वयक सुनीता वरराजन हे देखील उपस्थित होते.
प्रा पराग जोशी यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत केले आणि हा एफडीपी फलदायी ठरेल आणि प्रत्येक सहभागीला हा अनुभव सार्थकी लागेल अशी भावना व्यक्त केली. प्रा पराग जोशी यांनी प्रास्ताविक केले, त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत केले आणि हा एफडीपी फलदायी ठरेल आणि प्रत्येक सहभागीला हा अनुभव सार्थकी लागेल अशी भावना व्यक्त केली.
प्रा कविता होले आणि सुनीता वरराजन यांनी आपले विचार व्यक्त केले आणि सहभागींना शुभेच्छा दिल्या. वरदराजन म्हणाल्या की कालिदास विद्यापीठाने आयोजित केलेला एफडीपी हा नेहमीच आनंददायी आणि उत्तम अनुभव असतो. शांत वातावरण आणि वैचारिक सत्रांसह विद्वान प्राध्यापकांची अभ्यासपूर्ण व्याख्याने सर्वांसाठी एक मेजवानी असेल. सर्व सहभागी प्राध्यापकांनी आपला परिचय कुलगुरूंना करून दिला.
कुलगुरू प्रा हरेराम त्रिपाठी यांनी आपल्या प्रेरक भाषणात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणात प्राचीन शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आला आहे. भारतात, आपल्याकडे शिकण्यासाठी सर्वोत्तम गुरुकुल प्रणाली आहे. या प्रणालीचे अनेक पैलू आहेत. ही पद्धती सर्वांना विचार करण्याचे स्वातंत्र्य देते ज्यामुळे प्रत्येकाला जीवन, निसर्ग आणि या विश्वाच्या पलीकडे कुतूहल निर्माण होते.
ही प्रणाली जीवन शिक्षा तर देतेच परंतु अध्यापनाचा वैज्ञानिक मार्ग, तर्कशुद्ध विचार, वादविवाद, प्रश्नोत्तरे इत्यादी द्वारे कसे शिकावे हे हि शिकवते. सर्व सहभागींना आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेण्याची आणि नवीन अभ्यासक्रमांची रचना करताना तिचा संनिवेश कसा करावा हे शिकण्याची उत्तम संधी मिळेल. ही गुरुकुल पद्धत शिक्षकाचे चारित्र्य घडविते; नैतिकता संपन्न करते. मी या FDP मध्ये सर्व प्राध्यापकांचे स्वागत करतो. FDP साठी हा विषय घेतल्याबद्दल मी आयोजकांचे अभिनंदन करतो.
उद्घाटन सत्राचे संचालन सहाय्यक प्राध्यापिका डॉ श्वेता शर्मा यांनी केले.