हिंदी विश्वविद्यालयात स्‍वामी विवेकानंद उद्यान व स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संकुलाचे लोकार्पण

वर्धा : महात्‍मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील प्रशासकीय भवनाजवळील स्‍वामी विवेकानंद उद्यान व मुख्‍य प्रवेश द्वाराजवळील स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संकुलाचे लोकार्पण राज्‍यसभेचे माजी सदस्‍य डॉ. विनय सहस्‍त्रबुद्धे यांच्या हस्ते रविवार, 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

यावेळी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांची गरिमामयी उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. भीमराय मेत्री होते. याप्रसंगी विशवविद्यालयाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांच्या सह अधिष्ठातागण, विभागाध्यक्ष, अध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com