विवेकानंद महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन
महिला सबलीकरणात अहिल्यादेवी होळकरांचे मोलाचे योगदान – डॉ रमेश पांडव
छत्रपती संभाजीनगर : अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ धार्मिक व सांस्कृतिक उत्थानाचे कार्य केले नाही तर, महिला सबलीकरणासाठी अत्यंत मोठी चळवळ उभी केली असे गौरोद्गार गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेचे माजी प्रमुख डॉ रमेश पांडव यांनी आपल्या बीजभाषणात काढले. विवेकानंद महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय अभ्यास शिबिरात ते बोलत होते.
तसेच प्रास्ताविकपर भाषणात अहिल्यादेवी होळकर यांचे प्रागतीक विचार आजही समाज सुधारण्यासाठी आवश्यक असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दादाराव शेंगुळे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये डॉ नम्रता भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांचे प्राचीन काळातील धार्मिक व जल व्यवस्थापनासंदर्भात विचार मांडले. तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ भास्कर टेकाळे यांनी अहिल्यादेवी होळकर, प्रशासन व्यवस्था, करव्यवस्था स्थापत्य व्यवस्था या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.
डॉ देवमुंडे यांनी या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. शर्मिष्ठा ठाकूर यांनी सुत्रसंचलन केले, तर उपप्राचार्य डॉ टी आर पाटील, यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ अरुणा पाटील, डॉ राजेंद्र शेजुळ, डॉ आप्पाराव वागडव, डॉ अरुण वाहुळ, डॉ कैलास भरकड, प्रा राजेंद्र सोरमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.