नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर आण्विक जीवशास्त्र आणि अनुवंशिक अभियांत्रिकी विभागात (एमबीजीई) सोसायटीचे उद्घाटन संपन्न
डॉ भरत सूर्यवंशी व सिद्धार्थ खोब्रागडे यांचे व्याख्यान
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर आण्विक जीवशास्त्र आणि अनुवंशिक अभियांत्रिकी विभागात (एमबीजीई) सोसायटी उद्घाटन कार्यक्रम मंगळवार, दिनांक १ आक्टोंबर २०२४ रोजी पार पडला. या अनुषंगाने पेटंट आणि डिझाईनचे सहाय्यक नियंत्रक डॉ भरत सूर्यवंशी व सिद्धार्थ खोब्रागडे यांचे अतिथी व्याख्यान पार पडले.
विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षस्थान विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, पेटंट कार्यालय नागपूर येथील पेटंट आणि डिझाइन सहायक नियंत्रक डॉ भरत सूर्यवंशी, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक सिद्धार्थ खोब्रागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सहाय्यक नियंत्रक डॉ भरत सूर्यवंशी यांनी पेटंट कार्यालयाच्या स्पर्धा परीक्षेविषयी माहिती दिले. सोबतच पेटंट व डिझाईनच संबंधित विविध विषयांवर त्यांनी व्याख्यान दिले.
सिद्धार्थ खोब्रागडे यांनी एमबीजीई सोसायटीचे उद्घाटन करीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भाषण केले. जीवन जगण्याच्या विविध शैलीने विषयी त्यांनी त्यांच्या भाषणातून मार्गदर्शन केले. मेहनती आणि गुणवत्ताधारक विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय उभा करताना दिसतात, असे एमबीजीई, सोसायटीचे अध्यक्ष तथा विभाग प्रमुख डॉ दयानंद गोगले म्हणाले. एमबीजीई सोसायटीने विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले असल्याचे ते म्हणाले.
एमबीजीई सोसायटीचे सचिव सुमित वडभुडे यांनी विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी वर्षभरात आयोजित केलेल्या कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण सत्र, अतिथी व्याख्याने आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम यासह केलेल्या कामगिरी देत कार्यक्रमांचा आढावा घेतला. यात दोन विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळाली. एकाला परदेशात पीएचडी करण्यासाठी आणि दुसऱ्याला बंगलोरच्या केंद्रीय संस्थेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली. अनेक विद्यार्थ्यांनी एमएस- सिईटी परीक्षा उत्तीर्ण केली तल दोन विद्यार्थ्यांना महाज्योती फेलोशिप पुरस्कार प्राप्त झाला. आठ विद्यार्थ्यानी विद्यापीठात शिक्षक आणि कार्यालय सहाय्यक पदे मिळविली. काही विद्यार्थ्यांनी मौखिक आणि पोस्टर शोध निबंध सादरीकरणात आणि भिंत चित्रकला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले.
या प्रसंगी प्रा रुचि वासनिक, डॉ माधुरी ठाकरे, रेनुका व्यवहारे, डॉ स्वाती गोडघाटे, डॉ प्रज्ञा अनासने, क्षितिज शहारे आणि नेहा कोहपेरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विभागातील अतिथी प्रा डॉ प्रमोद रामटेके यांना ‘द लॅन्सेट’ मध्ये ९८ पेक्षा अधिक प्रभाव घटक असलेल्या शोधपत्राच्या प्रकाशनाबद्दल सन्मानित केले गेले. विभाग प्रमुख डॉ गोगले यांना शाल आणि रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
या वर्षी एमबीजीई सोसायटीच्या विविध पदांसाठी खालील सदस्यांची निवड करण्यात आली. सोसायटी सचिव म्हणून सुमित वडभुडे, संयुक्त सचिव- श्रद्धासुमन करहाडे, कार्यक्रम व्यवस्थापक- साक्षी पाटील, संयुक्त कार्यक्रम व्यवस्थापक- अदिती साबळे, कोषाध्यक्ष सोनसखळी तलांडे, संयुक्त कोषाध्यक्ष मोहित गोडे, मासिक संपादक – सुनीता साहू, संयुक्त मासिक संपादक हर्ष पवार यांचा समावेश आहे. वैष्णवी गुप्ता आणि कोमल धावडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर संयुक्त सचिव श्रद्धासुमन करहाडे यांनी आभार मानले.