गोंडवाना विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा स्पार्क अभ्यासक्रमाचे उद्घाटन
शिक्षणासोबत सामाजिक जबादारी शिकणे काळाची गरज – डॉ अभय बंग
आदर्श पदवी महाविद्यालय आणि सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी रोजगारभिमुख पदव्यूत्तर शिक्षण
सर्च व आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न
गडचिरोली : विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी व सामाजिक गोष्टी शिकताना कर्तव्य निष्ठेने काम करणे व जबाबदारी पूर्वक काम शिकणे या उद्देशाने आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क पदव्युत्तर डिप्लोमा कोर्स राबविल्या जात आहे. या अंतर्गत अभ्यासक्रमाची ओळख करून देण्याच्या हेतूने सर्च येथे अभ्यासक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ अभय बंग सर्च गडचिरोली, प्रमुख अतिथी म्हणून डॉ कृष्णा कारू प्राचार्य आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व डॉ मनीष उत्तरवार संचालक ननावसा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून कण्यात आली.
याप्रसंगी डॉ अभय बंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी व कर्तव्याची जाणीव असायला पाहिजे. सामाजिक शिक्षण शिकायचा असेल तर समाजात प्रत्यक्ष उतरणे गरजेचे असल्याचे व्यक्त केले. तसेच त्यांच्या शैक्षणिक जीवन प्रवासातील शिकलेल्या विविध प्रसंगाच्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती दिली.
प्रमुख अतिथी डॉ मनीष उत्तरवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्पार्क अभ्यासक्रम काम करणे, शिकणे आणि कमविणे या पैलूंवर आधारित तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी व्यक्त केले, सोबतच विद्यार्थ्यांना सदर कोर्सच्या माध्यमातून समाजात जाऊन प्रत्यक्ष कार्य करण्याची संधी मिळत असल्याचे व्यक्त केले. मागील दोन वर्षात सदर कोर्स पूर्ण केलेल्या जवळपास १५ विद्यार्थ्यांना पूर्ण रोजगार मिळाले असल्याचे यावेळी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
डॉ कृष्णा कारू यांनी आदर्श पदवी महाविद्यालय आणि सर्च यांच्या संयुक्त असलेल्या स्पार्क अभ्यासक्रमाची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगून कोर्सच्या माध्यमातून मुक्तीपथ अंतर्गत सुरू असलेल्या व्यसनमुक्ती अभियानामध्ये समाजातील वेगवेगळ्या बाबींवर कार्य करण्याची संधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले तसेच कोर्स पूर्ण केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील असल्याचे यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन तुषार खोरगडे यांनी केले आणि आभार संतोष सावलकर सर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्च संस्थेची संपूर्ण टीम व मुकूल पराते सह-समन्वयक आदर्श पदवी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांनी कार्य केले.