दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाईड सायन्समध्ये ‘प्रारंभ २०२४’ स्वागत समारोहाचे उद्घाटन
दत्ता मेघे अभिमत विद्यापीठातील आयोजन
वर्धा : दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाईड सायन्स, सावंगी येथील कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि साइन्स अँड टेक्नॉलॉजी शाखेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांचा ‘प्रारंभ २०२४’ स्वागत समारोह घेण्यात आला.
या समारोहाचे उद्घाटन अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ गौरवकुमार मिश्रा यांनी केले. यावेळी, महासंचालक डॉ राजीव बोरले, संचालक डॉ क्षितिज राज, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्रभारी अधिष्ठाता प्रा सुप्रिया नरड, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रा डॉ दीपक शर्मा, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डाॅ के टी व्ही रेड्डी, दत्ता मेघे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पेठे, प्रवेश विभाग प्रमुख डॉ अजय पेठे, अधिष्ठाता डॉ उमेश शिवहरे, शालिनीताई मेघे कॉलेज ऑफ जीएनएम नर्सिंगच्या प्राचार्य अख्तरीबानो शेख यांची उपस्थिती होती.
या समारोहात डॉ गौरव मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. ‘प्रारंभ २०२४’ या दहा दिवसीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व, व्यवस्थापन कार्यशाळा तसेच औद्योगिक भेट आदी विविध उपक्रम राबविणार असल्याचे अधिष्ठाता डॉ पंकजकुमार अनवडे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग आणि पेनड्राईव्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
समारंभाचे प्रास्ताविक डॉ क्षितिज राज यांनी केले. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा प्रांजली उल्हे यांनी केले तर आभार प्रा सुप्रिया नरड यांनी मानले. या समारोहाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी शैला चौधरी, प्रा शैलेश गहाणे, प्रा भावना कुबडे, प्रा मोना डेकाटे, प्रा चेतन परळीकर, प्रा प्रांजली उल्हे, डॉ मायकेल, प्रा सुधीर आगरमोरे, डॉ विजेंद्र शाहू, प्रा प्रवीण भगत, प्रा अमोल मशानकर, प्रा अतुल ठवरे, प्रा शुभम कदम, प्रा सौरभ निमजे, दीपक तिघरे, नवीन बरडे, राहुल मानकर, प्रशांत मानमोडे आदींनी परिश्रम घेतले.