भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटस् चे अमरावती विद्यापीठात म्युझियमचे उद्घाटन

कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन

विद्यार्थ्यांना सी ए म्युझियमचा मोठा लाभ होणार – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

अमरावती : भारतीय चार्टर्ड अकाऊंटंटस् अमरावती शाखेचे अकाऊन्टन्सी म्युझियम संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एम बी ए विभागात सुरू झाले असून त्याचे उद्घाटन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी आज फित कापून केले. अमरावती सी ए फाऊंडेशनच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या म्युझियमचा वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होईल, असे याप्रसंगी बोलतांना कुलगुरू डॉ मिलींद बारहाते म्हणाले.

सी ए फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाऊंटबाबत मार्गदर्शन मिळेल तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना इटर्नशीप मिळू शकेल असा विश्वास याप्रसंगी अमरावती सी ए शाखेच्या पदाधिका-यांनी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्याशी वार्तालाप करतांना व्यक्त केला.

Advertisement

या म्युझियममुळे विद्यार्थ्यांना पूर्वीच्या आणि सध्याच्या लेखापरिक्षणाविषयाची जाण व्हावी, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांनाही त्याचे ज्ञान मिळावे, या दृष्टीने अनेक मान्यवर सी ए यांचे माहिती देणारे लेख देखील पोस्टर्सरुपाने लावण्यात आल्याची माहिती एम बी ए विभागप्रमुख डॉ डी वाय चाचरकर यांनी दिली. यावेळी वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे अध्यक्ष सी ए अंकित राठी, उपाध्यक्ष सी ए राहुल पारेख, सचिव सी ए गौतम लाठ, कोषाध्यक्ष सी ए पिंकी केडिया, सी ए सौरभ अजमेरा, अमरावती सी ए फाऊंडेशनच्या अध्यक्ष सी ए अनुपमा लढ्ढा, सचिव दिव्या त्रिकोटी तसेच एम बी ए विभागातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page