श्री शिवाजी महाविद्यालयात मराठी भाषा वाडमय मंडळाचे उद्घाटन संपन्न
श्री शिवाजी महाविद्यालय – मराठी विभागाचा उपक्रम
परभणी : श्री शिवाजी महाविद्यालयात येथे मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा वाडमय मंडळाचे उद्घाटन प्रसिद्ध कवी शंकर कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे होते तर मंचावर प्रमुख उपस्थिती मराठी विभाग डॉ प्रल्हाद भोपे, डॉ राजू बडूरे यांची होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रल्हाद भोपे यांनी केले. कार्यक्रमाबाबतची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मंडळ राबवित असलेल्या उपक्रमांचा उद्देश सांगितला. उद्घाटकीय भाषणात सुप्रसिद्ध कवी शंकर कदम यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी व्यक्त झाले पाहिजे व ते कथा कविता चित्र लेखन माध्यमातून. साहित्य मनुष्याच्या मनाचा, भावनेचा विकास करते. विद्यार्थ्यांनी बहुश्रुत व्हावे. असे ते म्हणाले. त्यांनी देशभक्ती, नाते संबंध, निसर्गप्रेम, सामाजिक बांधिलकी, वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रेम आदी विषयावरील कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रबोधित केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे यांनी केला. वाडमय मंडळाचे अध्यक्ष निकिता लोंढे, उपाध्यक्ष सचिव दीपक, फुलझळके, उपाध्यक्ष निकिता आसेवार, दिव्या रेवणवार, राणी सातव, राधा कदम, कल्याणी तपोवनकर, योगेश चिलगर, ऋषिकेश कच्छवे या सर्व सदस्यांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक फुळझळके या विद्यार्थ्यांने केले तर आभार प्रदर्शना नंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा अंकुश खटिंग, प्रा सारिका कोकीळ, प्रा अनिल बडगुजर, प्रा मयुर शिंदे आदींनी प्रयत्न केले.