अमरावती विद्यापीठात आजीवन अध्ययन विस्तार अभ्यासक्रमाचा कार्यप्रेरण कार्यक्रमाचे उद्घाटन

डॉ श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यप्रेरण कार्यक्रमाची सांगता होणार

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील एम ए आजीवन अध्ययन व विस्तार अभ्यासक्रमाचा प्रवेश समारंभ व सत्रातील कार्यप्रणालीसंबंधी कार्यप्रेरण कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच आभासी पद्धतीने संपन्न झाले, तर दि 9 सप्टेंबर, 2024 रोजी डॉ श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यप्रेरण कार्यक्रमाची सांगता होईल.

Advertisement

डॉ श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते डॉ धनंजय लोखंडे यांनी आभासी पद्धतीने आजीवन अध्ययन आणि मानवी जीवन, कार्यकुशलता, एन जी ओ, सामाजिक अभिसरण व अभ्यासक्रमाचे महत्त्व यावर विद्याथ्र्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे चालविल्या जात असलेल्या विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रमाची प्रगतीच्या वाटेने होणा­या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थी प्रवेशित उद्बोधन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना अभ्यासक्रम समन्वयक डॉ प्रशांत भगत यांनी एम ए आजीवन अध्ययन व विस्तार अभ्यासक्रमाची उपयोगिता पटवून देऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कौशल्यधिष्ठीत अभ्यासक्रमाचे अध्ययन करणा­या विद्यार्थ्याला हा अभ्यासक्रम जीवनात यशाचा मार्ग निश्चितपणे दाखवू शकतो, असे उद्बोधित केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा वैभव जिसकार यांनी, तर आभार प्रा अर्चना ढोरे यांनी मानले. उद्बोधक कार्यक्रमात अभ्यासक्रमाचे सर्वच विद्यार्थी आभासी पद्धतीने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page