श्री बंकटस्वामी महाविद्यालयात भाषा व साहित्य मंडळाचे उत्साहात उद्घाटन संपन्न
बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयातील भाषा व साहित्य मंडळाचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी भाषा विषयाच्या वतीने साहित्य मंडळाचे उद्घाटन केले जाते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी या विभागाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याही वर्षी हिंदी, इंग्रजी, मराठी या विषयाच्या वतीने भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ प्रा रमेश रिंगणे यांच्या हस्ते या मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले भाषेचे महत्त्व आणि साहित्याचा समाजावर होणारा परिणाम यावर सखोल असे मार्गदर्शन केले.आज आपण सामाजिक माध्यमांचा आपल्या जीवनावर व वर्तनावर होणारा परिणाम पाहत असतो. रोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या दैनंदिन जीवनावर माध्यमांचा परिणाम होताना दिसून येतो आपण नेहमी आपली वाणी आणि भाषा ही सुसंस्कृत कशी राहील यासाठी आपण साहित्याचे वाचन व चिंतन करणे विद्यार्थ्यांनी आवश्यक असते असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले आपण साहित्याच्या जोरावर आपली सकारात्मक विचारसरणी विकसित करू शकतो, चांगले जीवन जगू शकतो, संवाद साधण्याची कला आत्मसात केल्यानंतर आपल्यामध्ये कायम सुसंवाद राहतो म्हणून भाषेचे महत्त्व तसेच साहित्याचे महत्त्व देखील आपल्याला विकसित करण्यामध्ये व आनंदी जगण्यासाठी उपयुक्त असते म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ग्रंथालयात जाणे, चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे साहित्याची निर्मिती करणे व आपल्या कलागुणांना या माध्यमातून वाव देणे आवश्यक असते असे माध्यमे व्यक्त केले.
याप्रसंगी हिंदी व मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भिंती पत्रकाचे देखील विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दत्ता तोडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा डॉ शंकर शिवशेट्टे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.