डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘कलादृष्टी-२०२४’ प्रदर्शनाचे उद्घाटन

ललित कलाविभागात प्रदर्शनाचे उद्घाटन

’कलादृष्टी’मध्ये दिडशे पेटिंगचा समावेश

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभागातील ‘कलादृष्टी-२०२४’ या वार्षिक कला प्रदर्शनात दिडशे पेंटिंगसह सुमारे पाचशे कलाकृतींचा समावेश करण्यात आला आहे. ललित कला विभागात १९ ते २२ मार्च या दरम्यान ’कलादृष्टी- २०२४’ या वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१९) उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिध्द व्यक्तिचित्रकार प्रा अब्दुल गफर (नागपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विभागप्रमुख डॉ शिरीष अंबेकर, डॉ गजानन पेहेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत ले चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनांमध्ये दिडशे पेंटिंग व उपयोजित कलेच्या पाचशे कलाकृतींचा समावेश आहे. यावेळी प्रा गफार यांनी म्हणाले की आपण निवडलेल्या अभ्यासक्रमाच्या त्रुटी भरून काढण्यासाठी इंटरनेट, इंटरनेटवरील मोबाईलचा वेळ कमी करून किमान दररोज एक तास तरी स्वतःच्या कामासाठी जास्तीचा वेळ द्यायला हवा व त्या एक तासाच्या केलेल्या कामाची नोंद ठेवणे गरजेचे आहे त्याने आपल्या कामात अधिक सुधारणा होण्यास फार मोठ्या प्रमाणात मदत होते. जाहिरातींना व विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना व्यवसायिक स्पर्श टच असायला पाहिजेत, यासाठी विद्यापीठाच्या सहकार्याने इंडस्ट्रियल एक्सपोचे आयोजन करण्यात येईल असे प्रं -कुलगुरू डॉ वाल्मिक सरवदे यांनी सांगितले.

याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आले. डॉ गजानन पेहेरकर यांनी सूत्रसंचालन तर निखिल राजवर्धन यांनी आभार मानले. बाळकृष्ण छडीदार, सौरभ शिरभाते यांचे या प्रदर्शनास सहकार्य लाभले. या प्रसंगी प्रा गफार यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिचित्रणाचे प्रात्यक्षिक दिले. कार्यालयीन वेळेत चार दिवस दररोज हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विभागप्रमुख डॉ शिरीष अंबेकर यांची केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page