उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेशीत बी टेक प्रथमच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे उदघाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशीत बी टेक प्रथमच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि ९ ते २१ सप्टेंबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

संस्थेचे संचालक प्रा ए के गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविक प्रा विकास पाटील यांनी केले. विविध अभ्यासक्रमांचे विभाग प्रमुख प्रा आर पी गोरे, प्रा जे एस नारखेडे, प्रा विशाल पराते, प्रा पी डी मेश्राम, प्रा जी ए बाठे, प्रा आर एस सिरसाम यांनी विभागाची माहिती दिली. संचालक प्रा ए के गोस्वामी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांसाठी संस्था कटीबध्द असल्याचे सांगितले. प्रा दिपाली भोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा विनित काकडे यांनी आभार मानले. या इन्डक्शन कार्यक्रमात विविधि क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देणार आहे.