ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्रात लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न
लिंगभाव प्रबोधनासाठी आणखी प्रयत्नांची गरज – अभ्यासक सुरज पवार यांचे मत
छत्रपती संभाजीनगर : आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माणसातील संवाद कमी होत असल्याने कौटुंबिक व लैंगिक प्रश्न वाढत आहेत. अशावेळी लिंगभावात्मक प्रबोधनाचीसाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘जेंडर स्टडी’चे अभ्यासक सुरज पवार यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना पद्वयुत्तर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ सप्टेंबर रोजी लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यशाळेचे उद्घाटक प्रा भारती गोरे, केंद्राच्या संचालक डॉ निर्मला जाधव समन्वयक डॉ अश्विनी मोरे, प्रा बलभीम चव्हाण, डॉ गजानन दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुणे येथील अभ्यासक सुरज पवार हे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गेल्या काही वर्षात समाज स्वास्थ्य बिघडलेले आपण पाहत आहोत. त्यामुळे महिलांसोबतच पुरुषांना आज संवेदनशिल होण्याची जास्त आवश्यकता आहे. लिंगभाव ही एक व्यापक संकल्पना आहे. लिंगभाव, पुरुषसत्ता,सत्तेचे स्त्रोत व स्त्रीवाद यावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणने गरजेचे आहे. सामाजिक मुल्ये, मोठ्यांच्या आदर करणे गरजेचे आहे. समाजव्यवस्था मुलांना व मुलींना घडवत असतात वेगवेळ्या पातळीवर मुलांसाठी लिंगभाव प्रबोधन कार्यशाळेची आवश्यकता मोठया प्रमाणात आहे त्यांना लिंगभाव, पितृसत्ता हे निटपणे समजले पाहिजे. त्यांचे प्रशिक्षण व समुपदेशन होण्यासाठी अशा कार्यशाळा नियमित आयोजित केल्या पाहिजेत.
यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षा प्रा भारती गोरे म्हणाल्या लिंगभाव प्रबोधनाची किती मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे ही गोष्ट त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितली व महिलांचे अधिकार यावर चर्चा करत महिलांनी आता बदलण्याची गरज आहे आपले निर्णय स्वतः घेण्याची आवश्यकता आहे असं मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.
प्रा अश्विनी मोरे यांनी कार्यशाळेचे प्रास्तविक केले. समाजातील स्त्रियांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजावे व स्त्रियांप्रती आदरभाव असणारे सुदृढ समाजमन घडविण्याच्या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असे प्रास्ताविकात त्या म्हणाल्या. प्रा बलभीम चव्हाण यांनी कार्यशाळेला संबोधित केले. सूत्रसंचालन सुनिता शिंदे यांनी तर कांचन गादीकर यांनी आभार मानले.