CSMSS आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित अत्याधूनिक पंचकर्म केंद्राचे पद्माकरकाका मुळे यांच्या हस्ते लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर : कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित नवीन अत्याधूनिक पंचकर्म केंद्राचे पद्माकरकाका मुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी पद्माकरकाका मुळे म्हणाले की, हजारो वर्षांपासूनच्‍या शाश्‍वत, प्रभावी अणि उपयुक्त अश्या आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच आयुर्वेदाच्या वैज्ञानिक दृष्‍टीने सेवा, संशोधन व शिक्षण देण्‍याच्‍या उद्देशाने केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालय सातत्याने सकारात्मक कार्य आणि प्रयत्न करत आहेत. आयुर्वेदाच्या वैज्ञानिक दृष्‍टीने सेवा, संशोधन व शिक्षण देण्‍याच्‍या उद्देशाने पंचकर्म वैद्यकीय केंद्राच्या विस्तारामुळे अधिकाधिक रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. या नवीन संकुलात नवीन चेंबर्स बांधण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या नवीन पंचकर्म वैद्यकीय केंद्राच्या विस्तारामुळे पूर्वी दररोज अनेक रुग्णांना आरोग्य लाभ मिळत होते, आता दररोज सुमारे २५० पेक्षा जास्त रुग्णांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. पंचकर्म ही एक शुद्धिकरण उपचार पद्धती आहे जी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकून अनेक रोग पूर्णपणे नष्ट करते.

Advertisement
Inauguration of expanded state-of-the-art Panchakarma Center of CSMSS Ayurveda Hospital by Padmakarkaka Mule
CSMSS आयुर्वेद रुग्णालयाच्या विस्तारित नवीन अत्याधूनिक पंचकर्म केंद्राचे उद्घाटन करताना पद्माकरकाका मुळे सोबत डॉ. श्रीकांत देशमुख,
अशोक आहेर, संजय अंबादास पाटील.

संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख म्हणाले की, आजच्या व्यस्त जीवनात लोकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की, माणूस प्रत्येक श्वासासोबत एक प्रकारचे विष पीत आहे. चरक संहितेत वेगवेगळ्या आजारांनुसार आहार नियोजन आणि सल्ला देण्यात आला आहे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, हाडांचे आजार, पक्षाघात या आजारावर देखील आयुर्वेदाचा उपयोग होतो. अत्याधूनिक पंचकर्म नवीन केंद्र उभारणे ही काळजी गरज आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, आयुर्वेद रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नरेश निंबाळकर, विभाग प्रमुख, परिचारिका, रुग्ण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page