अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट द्वारा आयोजित डिपेक्स २०२५ चे उद्घाटन
डिपेक्स 2025: नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भव्य प्रदर्शनचे उद्घाटन संपन्न
पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सृजन ट्रस्ट, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन, सीओइपी टेक्नोलॉजिकल यूनिवर्सिटी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित डिपेक्स 2025 ही 34 वी आवृत्ती, पुणे येथे COEP तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत होणार आहे. यावर्षी डिपेक्स मधील प्रदर्शनाला पद्मविभूषण रतन टाटा यांचे नाव देण्यात आले आहे.
या प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे तसेच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष शरद गोस्वामी आणि प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन ट्रस्ट द्वारा आयोजित डिपेक्स २०२५ चे उद्घाटन डीआरडीओ चे माजी अध्यक्ष डॉ सतीश रेड्डी यांच्या हस्ते संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मुख्य उपस्थिती लाभली. सीओईपी तंत्रनिकेतन विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भिरुड, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान आणि सृजन चे विश्वस्त राजेंद्र हिरेमठ, डॉ प्रकाश धोका, अथर्व कुलकर्णी, संकल्प फळदेसाई , प्रसेनजित फडणवीस, शांतिनाथ बागेवाडी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आणि सत्काराने झाली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमात विद्यार्थी परिषद आणि डिपेक्स ची संकल्पना मांडली. तसेच तरुणाच्या नाविन्यपूर्ण कल्पनाने कशा बदल घडू शकतो आणि त्याचा विकासाला कसे मदत होईल हे मांडले. तसेच जगात प्रशिक्षित तरुण तरुणींना संधी उपलब्ध आहेत असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून जी सतीश रेड्डी उपस्थित होते. त्यांनी भारतातील तरुणांनी आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांचा भारताच्या शांतीपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्याची पूर्तता डिपेक्स सारख्या प्रदर्शनातून पूर्ण होईल असे सांगितले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी बोलताना भारतात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे तसेच आपण भारत हा कृषिप्रधान तसेच औद्योगिक देश आहोत असे सांगितले.
ABVP आणि सृजन ट्रस्ट द्वारे आयोजित, 1986 मध्ये स्थापित, DIPEX हे कार्यरत मॉडेल्सचे एक प्रतिष्ठित राज्यस्तरीय प्रदर्शन-सह-स्पर्धा आहे. हे व्यासपीठ अभियांत्रिकी/तंत्रज्ञान आणि कृषी विषयातील डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर कार्यक्रम तसेच महाराष्ट्र आणि गोव्यातील आयटीआयमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करते.
या मध्ये सहभागकर्त्यांसाठी एकूण नऊ परिसंवादाचे/ सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे हे सेमिनार प्रतिष्ठित यश उद्योजक व व्यक्तिमत्व घेणार आहेत.शैक्षणिक समाज आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे व वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय विकसित करणे, हे डिपेक्सचे मूळ उद्दिष्ट आहे. यासाठी ११ आधारभूत कल्पनांचे जसे कृषी तंत्रज्ञान, संगणकीय बुद्धिमत्ता ,संरक्षण आणि सायबर सुरक्षा, ऊर्जा, आरोग्यसेवा/ वैद्यकीय तंत्रज्ञान, ऑटोमेशन, गतिशीलता, सुरक्षितता शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन, ओपन इनोवेशन असे ११ विभाग आहेत.
यावर्षी ३४ व्या डिपेक्स मध्ये महाराष्ट्र व गोवातून एकूण २००३ प्रोजेक्ट सहभागी झाले होते. यामधून ११ विभागात झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेले सर्वोत्तम ४०० प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या नगर सीओईपी कॉलेज मैदान पुणे येथे ३ ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत होत आहे.
DIPEX-2025 ची वैशिष्ट्ये :
- 2000 हून अधिक नोंदणी, 350 हून अधिक कार्यरत मॉडेल, सुमारे 5000 सहभागी.
- प्रतिष्ठित अभ्यागत: उद्योग व्यावसायिक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी
- स्टार्ट-अप, उष्मायन केंद्रे आणि आयपीआर पॅव्हेलियन 11 प्रदेश: कोल्हापूर, कराड, सोलापूर, नाशिक, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, नांदेड, जळगाव, मुंबई, रत्नागिरी.
•चार दिवस विविध सांस्कृतिक देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोग संधी , अभ्यासपूर्ण सत्रे आणि पॅनेल चर्चा: - भविष्यवादी तंत्रज्ञान आणि सामाजिक थीम , भारतीय विचारधारा , पहिल्या पिढीतील उद्योजकांशी संवाद.
- आकर्षक पुरस्कार आणि बक्षिसे: शोध, सर्वोत्कृष्ट उद्योग प्रायोजित प्रकल्प (ISP), वुमन आणि टेक्निकल इनोव्हेशन (WATI), MSBTE अवॉर्ड, जनरल चॅम्पियनशिप, प्रत्येक थीमॅटिक विभागात 1ले आणि 2रे बक्षिसे आणि बरेच काही.