आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकीत संवाद कौशल्य विकासासाठी ‘कम्युनिकॅडो’ क्लब चे उद्घाटन
शिरपूर : आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील अॅप्लाइड सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाच्या वतीने “कम्युनिकॅडो” या क्लबच्या उ्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. महाविद्यालयातील सर्वच विभागातील विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने भाषिक तसेच संभाषण कौशल्य अधिक प्रभावीपणे विकसित करावे या संकल्पनेवर आधारित सदर क्लबचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक प्रा डॉ जे बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
उच्च शिक्षण क्षेत्र, नोकरी, समाजिक आणि व्यावसायिक जीवन अश्या आयुष्यातील सर्वच टप्प्यांवर मनुष्याला प्रभावी संवाद कौशल्य असणे आवश्यक बाब आहे. संवाद कौशल्य आणि तंत्रज्ञानाची जोड या जोरावरच आज मानव संपूर्ण जगात कुठेही सामाजिक आणि व्यावसायिक आघाडींवर प्रगती करीत आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ-मोठे उद्योग लाखोंच्या संख्येने असलेल्या मानव संसाधानासहित सुरळीतपणे सुरु आहेत. म्हणूनच उच्च शिक्षण असण्या सोबतच प्रभावी संवाद आणि भाषिक कौशल्य अवगत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात रोजगार तसेच व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षापासूनच सादरीकरण, समूह चर्चा, वकृत्व, मुलाखत, वाद विवाद, संवाद, वाचन, लेखन आणि श्रवण असे अनेक कौशल्य आत्मसाद केली पाहिजे. आर सी पटेल स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अनेक क्लब निरनिराळ्या उद्देशाने स्वयंस्फुर्तीने सक्रीय आहेत. याचबरोबर नुकताच संवाद कौशल्य विकासासाठी “कम्युनिकॅडो” या क्लबची निर्मिती करण्यात आली.
याद्वारे विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, अभियांत्रिकी क्षेत्रात उज्वल संधींसाठी आणि कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आवश्यक अश्या सर्व संवाद कौशल्याची ओळख आणि उजळणी उपक्रर्मांवर आधारित करवून घेण्यसाठी क्लबची स्थापना करण्यात आली. यात स्टोरी टेलिंग, सीन–एनअॅक्ट, प्रेझेंटेशन सारख्या विविध स्पर्धा, सेमिनार, कार्यशाळा, व्याख्यान, इत्यादी आयोजित करण्यासाठी सदर क्लब प्रतिबद्ध असणार आहे. महविद्यालयातील असे सर्व क्लबचे संचालन हे प्राध्यापकांच्या मार्गदर्शनात मुख्यत्वे विद्यार्थ्यांची कार्यकारणी स्वतः करीत असल्याने त्यांच्यातील समूह भाव, नेतृत्व गुण यांसारख्या कौशल्याचा देखील विकास होण्यास मदत होते. “कम्युनिकॅडो” क्लबच्या स्थापणेकरिता विभाग प्रमुख डॉ एस व्ही देसले, डीन ऑफ स्टुडन्ट अफेअर डॉ अमृता भंडारी आणि समन्वयक म्हणून डॉ किशोर ठाकरे यांच्या मार्गदर्शनात क्लबचे विद्यार्थी प्रमुख म्हणून सेजल सोनार, शिवम देसले आणि सर्व विद्यार्थी सभासद यांनी परिश्रम घेतलेत.
या क्लबच्या उद्घाटनाबद्दल शिरपूर एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्षा व संचालक जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संचालक चिंतनभाई पटेल, सचिव रेषा पटेल, संचालक अतुल भंडारी, महाविद्यालयाचे संचालक डॉ जे बी पाटील, उपसंचालक डॉ पी जे देवरे, परीक्षा नियंत्रक प्रा.सुहास शुक्ल, विभाग प्रमुख डॉ व्ही एस पाटील, प्रा पी एल. सरोदे, प्रा जी व्ही तपकिरे, डॉ एस व्ही देसले, डॉ आर बी वाघ, डॉ डी आर पाटील, डॉ उज्वला पाटील, डॉ एस ए पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा एम पी जैन, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रशांत महाजन तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.