गोंडवाना विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात उद्या शुक्रवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी, सकाळी ११.३० वाजता, गोंडवाना विद्यापीठ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
सदर कार्यक्रम कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून उद्घाटक म्हणून महाराज ऑफ नागपुरचे श्रीमंत राजे मुधोजी भोसले, तसेच राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण, पुणेचे अध्यक्ष
प्रा. नामदेवराव जाधव, हे प्रमुख वक्ते म्हणुन लाभणार आहेत. व प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत मोहिते उपस्थितीत राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. विकास चित्ते यांनी केले आहे.