सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन
नागपूर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय केंद्रीय वाचनालयाच्या वतीने दिनांक २४ ते २६ सप्टेंबर २०२४ ला तीन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीकांत चितळे एलएमसी सदस्य, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था नागपूर प्रकल्प आणि प्राचार्या डॉ रूपा वर्मा, सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालय नागपूर यांनी केले.
एस आर प्रकाशक आणि वितरक व जेपी प्रकाशक आणि वितरक यांनी पुस्तक प्रदर्शनात त्यांचा स्टॉल लावला. प्रदर्शनात ज्या प्रकाशकांची पुस्तके प्रदर्शित करण्यात आली त्यात जेपी, वोल्टर्स क्लुवर, EMMESS, सीबीएस, व्हिजन हेल्थ, फ्रंटलाइन्स, भानोत, पी वी, पारस आणि अरावली हे समाविष्ट आहे. पुस्तक प्रदर्शनात विविध नर्सिंग पुस्तके, पाठ्यपुस्तके व संदर्भ पुस्तके, स्पर्धात्मक पुस्तके इ.पुस्तके प्रदर्शित काण्यात आली.
या प्रदर्शनाला विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाचा विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी चांगलाच फायदा घेतला.
सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रुपा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण सेलुकर व अपर्णा इंगोले यांनी प्रदर्शन यशस्वीरित्या पार पाडले.