शिवाजी विद्यापीठात बी ए फिल्म मेकिंग कोर्सचे उद्घाटन

योग्य नियोजनातून कमी खर्चात लघुपट शक्य – स्वप्नील पाटील

शिवाजी विद्यापीठात ‘मधुबाला’ लघुपटाचे स्क्रीनिंग

कोल्हापूर : लघुपटासाठी खूप जास्त बजेट लागत नाही. अत्यंत कमी खर्चामध्ये लघुपट निर्मिती शक्य आहे. यासाठी उत्तम नियोजन आणि आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करायला हवा, असे मत दिग्दर्शक स्वप्निल पाटील यांनी व्यक्त केले.

लघुपटाची निर्मिती प्रक्रिया या विषयावर बोलताना दिग्दर्शक स्वप्निल पाटील

शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागा अंतर्गत बी ए फिल्म मेकिंग कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त चित्रकार, दिग्दर्शक स्वप्नील पाटील दिग्दर्शित  ‘मधुबाला’ शॉर्टफिल्मचे स्क्रिनिंग करण्यात आले. यावेळी लघुपटाची निर्मिती प्रक्रिया या विषयावर ते संवाद साधत होते. यावेळी मास कम्युनिकेशन आणि बी ए फिल्म मेकिंगचे समन्वयक डॉ शिवाजी जाधव, डॉ सुमेधा साळुंखे, विराज कुलकर्णी, मल्हार जोशी, आकाश बोकमुरकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 

Advertisement

प्रारंभी डॉ शिवाजी जाधव यांनी बी ए फिल्म मेकिंग या कोर्सची माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने कुलगुरू प्रा डॉ दिगंबर शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच बारावीनंतर तीन वर्षाचा पूर्ण वेळ चित्रपटाशी संबंधित अभ्यासक्रम सुरू केला आहे. तीन वर्षात शास्त्रीय पद्धतीने फिल्म मेकिंगचे शिक्षण दिले जाईल. कोर्ससाठी कोल्हापूर, सातारा, सांगलीसह रत्नागिरी, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव येथील विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले आहे. कोर्सचा अभ्यासक्रम हा फिल्म इंडस्ट्रीतील तज्ज्ञ मंडळींनी तयार केला आहे. शिवाय कमी शुल्कमध्ये विद्यार्थ्यांना नव्या गोष्टी शिकता येणार आहेत. 

दरम्यान, चित्रकार स्वप्नील पाटील यांनी शॉर्ट फिल्म संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शॉर्ट फिल्मची प्रक्रिया नेमकी कशी होती ते उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. गौतमी शिकलगार हिने सूत्रसंचालन केले. साजिद पिरजादे याने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page