डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरोग्य शिबिराचे उद्घाटन
पहिल्या दिवशी १५० जणांची तपासणी
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते बुधवारी (दि २४) करण्यात आले. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी, अधिकारी व प्राध्यापक यांच्यासाठी तीन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन २४ ते २६ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शिबिर घेण्यात येत आहे.
यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी डॉ कैलास पाथ्रीकर, उपकुलसचिव डॉ संजय कवडे, वैद्यकिय अधिकारी डॉ आनंद सोमवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. पहिल्या दिवशी हाडांची ठिसूळता तपासणी, बी पी तसेच शुगर तपासणी करण्यात आली. तर दुस-या दिवशी (दि २४) महिलांसाठी पॅप स्मिअर एक्झामिनेसन व शेवटच्या दिवशी (दि २६) नेत्ररोग तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी पंकज तायडे, डॉ सुनिता जाधव, सुशिला कांबळे, श्रध्दा उर्चित तसेच आरोग्य केंद्रातील निर्मला खरात, स्मिता पाईकराव, जनक गायकवाड आदी प्रयत्नशील आहेत. डॉ एस जी शिंदे यांनी सूत्रसंचालन तर कक्षाधिकारी नितीन पाटील यांनी आभार मानले.