दुसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी संमेलनात स्वलिखित काव्यवाचनात हरीश सोनवणे तर बोलीभाषा सादरीकरणात रोहित ठाकूर प्रथम क्रमांक
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने झालेल्या दुसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी संमेलनात स्वलिखित काव्यवाचनात हरीश सोनवणे या विद्यार्थ्याने प्रथम तर बोलीभाषा सादरीकरणात रोहित ठाकूर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. शनिवारी सायंकाळी सानेगुरुजी यांच्या साहित्याच्या अभ्यासक प्रा. चैत्रा रेडकर यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा उत्साहात समारोप झाला. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी अमळनेर येथील विद्यापीठ सांचलित प्रताप तत्वज्ञान केंद्रात एक दिवसाचे बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला १८० विद्यार्थी साहित्यिक यात सहभागी झाले होते. सायंकाळी प्रा चैत्रा रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. अध्यक्षस्थानी प्र-कलगुरू प्रा. एस.टी. इंगळे होते. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य अॕड. अमोल पाटील, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा व्य.प. सदस्य नितीन झाल्टे, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, अमोल मराठे, प्रा संदीप नेरकर, सुरेखा पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, केंद्राचे मानद संचालक प्रा. दिलीप भावसार आदी उपस्थित होते.
प्रा .रेडकर यांनी सामाजिकतेतून साहित्य घडत असते असे सांगून समाजाकडे डोळसपणे पाहून साहित्य निर्मिती करण्याचे आवाहन केले. प्रा. एस.टी इंगळे यांनी दर्जेदार साहित्यिक निर्माण व्हावेत या हेतूने विद्यापीठाने हा उपक्रम सुरू केल्याचे नमूद केले. यावेळी मु. जे महाविद्यालयाचा विद्यार्थी गुणवंत बोरसे, बेंडाळे महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी नेहा शिसोदे यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना हे संमेलन विद्यार्थ्यांना साहित्याची दिशा देणारे ठरेल असे मत व्यक्त केले. संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी संमेलनाचा आढावा घेतला. प्रा. पुरूषोत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
या संमेलनात झालेल्या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
काव्य वाचन
प्रथम – हरीश सोनवणे (कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कुसुंबा, धुळे),
द्वितीय – रोहित ठाकूर(विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे)
तृतीय – राज तायडे (मु. जे. महाविद्यालय,जळगाव)
उत्तेजनार्थ – मंजिरी निजरे(पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक महाविद्यालय, शहादा)
उत्तेजनार्थ – श्वेता गवळे (कला वाणिज्य महाविद्यालय, सोनगीर)
बोली भाषा सादरीकरण
प्रथम – रोहित ठाकूर( विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे)
द्वितीय – सायली पारकर (झेड बी पाटील महाविद्यालय, धुळे)
तृतीय – नेहा शिसोदे( डॉ अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय,जळगाव)
उत्तेजनार्थ – गुणवंत बोरसे (मु. जे. महाविद्यालय,जळगाव)
उत्तेजनार्थ – पूनम वळवी (आर. एफ एन एफ चे वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अक्कलकुवा)