अभिरुप युवा संसद स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाचा संघ सलग पाचव्यांदा विजयी
छत्रपती संभाजीनगर : ‘अभिरुप युवा संसद’ स्पर्धेत सलग पाचव्यांदा विभागीय स्तरावर महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त करीत विजयाची आपली परंपरा कायम ठेवली आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विजयी संघाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, डॉ.आशा देशपांडे यांनी अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षीही आपले उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघामध्ये एकूण २१ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी संघाने २ विधेयके आणि चार प्रश्न मांडली. अभिरुप युवा संसदेत विद्यार्थ्यांनी खालील पदांवर जबाबदारी पार पाडली.
सैफ शेख – सभापती
अक्सा खान – प्रोटेम सभापती
मनस्वी ढवळे – पंतप्रधान
राज पाटील – गृहमंत्री
बिलाल अन्सारी – संसदीय कार्यमंत्री
फारुख शेख – अल्पसंख्याक मंत्री
आकाश बाबर – कृषी मंत्री
सृष्टी सोनवणे – अर्थमंत्री
दिव्या चिंतामणी – शिक्षण मंत्री
संयम देशमाने – विरोधी पक्षनेते
अशफाक शेख – मुख्य व्हीप
नेहा चौधरी – नवीन सदस्य
हर्षद पवार – खासदार
अभिजीत तांगडे – खासदार
गायत्री लोधी – खासदार
विठ्ठल निर्मळ – खासदार
साची जीवने – खासदार
अजय राठोड – मार्शल
साक्षी रासकर – सचिव
करण जाधव – सदस्य
नागेश्वर बरसाळे – चोपदार
उत्कृष्ट संसदपटू म्हणून संयम देशमाने याची निवड झाली. त्याला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास श्रीकांत जोशी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब राजळे, ज्येष्ठ संपादक प्रविण बर्दापुरकर, परीक्षक रूपेश कलंत्री, युवक बिरादरीचे सचिन वाकुळकर, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. आशा देशपांडे व सर्व संबंधित उपस्थित होते.
विजेत्या संघांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
प्रथम विजेता : एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्रविद्या महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर
द्वितीय विजेता : मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, छत्रपती संभाजीनगर
उत्तेजनार्थ : दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर
उत्तेजनार्थ : महात्मा गांधी विद्यामंदिर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मनमाड
उत्तेजनार्थ : प्रताप कॉलेज, अमळनेर (स्वायत्त)
सर्व विजयी संघांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.