राजमाता जिजाऊ व राजीव गांधी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबीर संपन्न
दहावी, बारावी व पदवी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
घोडेगाव : राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालय, राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय, आणि सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे दहावी, बारावी व पदवीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव हे होते तर, प्रमुख अतिथी म्हणून डॉ दिलीप देशमुख साहेब (सेवानिवृत्त, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी), प्रा डॉ भगवान साखळे (माजी कुलसचिव व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर), डॉ विजय कुमार बांदल सर, डाॅ जीवनसिंग राजपुत, (जे जे पल्स हॉस्पीटल), दादासाहेब पाटील जाधव (उपसरपंच तथा तंटामुक्ती अध्यक्ष) प्रविण पाटील जाधव तसेच पालकवर्ग हे उपस्थित होते.
यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनी स्वागत गीत म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष साईनाथ पाटील जाधव यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र, एक मेडल आणि बक्षीसपर धनादेश देण्यात आले. यानंतर डॉ दिलीप देशमुख साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील संधी याबद्दल माहीती दिली. डॉ भगवान साखळे सर व डॉ जीवनसिंग राजपुत साहेब यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील तयारी, योग्य नियोजन, तणाव न घेता सकारात्मक मानसिकतेतून अभ्यास करावा. प्रा डॉ विजय कुमार बांदल यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी जाधव यांनी केले. तर आभार गोमलाडु सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळा, वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.