मिल्लिया महाविद्यालयाचे लसीकरण व आरोग्य सेवा जनजागृती अभियान यशस्वीपणे संपन्न
बीड : येथील मिल्लिया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे कामखेडा ता. बीड येथे लसीकरण व आरोग्य सेवा जनजागृती अभियान संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अर्चना बोराडे ( सी.एच.ओ.) यांनी पोलिओ, बीसीजी, पेंटा, गोवर, बूस्टर, टी. बी. रोटा डि, लेप्रोसी, डेंग्यू हत्तीरोग, मलेरिया, हीप्यातैसिस बी, बीसीएच याबद्दल सविस्तर माहिती दिली. व्हिटॅमिन ए, डी. टी. टी. टी. फॅमिली प्लॅनिंग, जंत नाशक मोहीम बद्दल सुद्धा मार्गदर्शन केले. लसीकरण बद्दल राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी, ग्रामस्थ यांना माहिती दिली.
श्री सुधाकर कुलकर्णी यांनी शासनाच्या आरोग्याबाबत विविध योजना कशाप्रकारे राबविल्या जातात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. तसेच ज्याच्याकडे रेशनकार्ड आहे, त्यांना रू. पाच लाख पर्यंतचा विमा दिला जातो हे विद्यार्थ्यांना सांगितले.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर मिर्झा असद बेग, डॉ. शेख रफीक, प्राध्यापिका डॉ. शेख एजाज परवीन, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.मोहम्मद इलयास फाजील यांचे सहकार्य लाभले.