विवेकानंद महाविद्यालयात इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रवेश ३१ जुलै २०२४ पर्यंत सुरु

छत्रपती संभाजीनगर : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, (UGC NAAC A++ प्राप्त मुक्त विद्यापीठ) प्रादेशिक केंद्र पुणे अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातील इग्नू IGNOU अभ्यासकेंद्र १६१० मध्ये  जुलै २०२३ सञाचे वेगवेगळ्या इग्नूच्या अभ्यासक्रमांना ३१ जूले २०२४ पर्यंत (www.ignou.ac.in) प्रवेश चालू आहेत. तसेच द्वितीय वर्षासाठी रिरजिस्ट्रेशन सुधा ३१ जुले २०२४ पर्यंत चालू आहेत.

Vivekanand College, Chhatrapati Sambhajinagar

इग्नू फ्रेश प्रवेशासाठी व रिरजिस्ट्रेशन साठी (ODL Mode)- ignouadmission.samarth.edu.in ह्या लिंकचा वापर करावा. विशेष आनंदाची बाब म्हणजे जुलै २०२४ सत्रापासून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाकडून नव्याने करण्यात आलेल्या तरतुदीनुसार इग्नू मध्ये एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेता येईल. तसेच दुसरी आनंदाची बाब म्हणजे SC / ST संवर्गातील विद्यार्थ्यांना BA, BSC, BSW, BTS, BBA व BCOM ह्या कोर्सेसला मोफत प्रवेश देण्यात येत आहेत.

इग्नू प्रवेशांमध्ये पदवी स्तरावर वेगवेगळ्या कोर्सेस मध्ये बीसीए, बीए, बी कॉम, बी एस डब्ल्यू, बीससी, बीबीए, बीटीएस तसेच मानास्शात्र, लोकप्रशासन, संस्कृत, समाजशास्त्र, इतिहास, इंग्लिश, राज्यशास्त्र अशा बऱ्याच विषयात honours असे प्रोग्राम्स सुरु झाले आहेत.

Advertisement

मास्टर्स डिग्री प्रोग्राम्स मध्ये पदव्युत्तर स्तरावर एम बी ए, एम ए इंग्लिश, हिंदी, एमएस डब्ल्यू, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, हिंदी, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, कॉमर्स, रूरल डेव्हलपमेंट, असे बरेच प्रोग्राम्स सुरु आहेत अधिक माहितीसाठी अभ्यास केंद्राला किंवा इग्नू वेब साईटला भेट द्यावी.

तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्राम्स मध्ये ट्रान्सलेशन, गांधी आणि पीस  स्टडीज, रूरल डेव्हलपमेंट, जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन, उच्चशिक्षण, डिझास्टर मॅनेजमेंट, बुक पब्लिशिंग,  टुरिझम , क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश अशा वेगवेगळ्या कोर्सेसना ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रवेश चालू आहेत. तसेच ह्या शेक्षणिक सत्रापासून 6 PGDs प्रोग्राम्स सुरू झाले आहेत, आधिक माहितीसाठी ignou.ac.in वर Common Prospectus २०२४ ला भेट द्यावी.

१)     PGDBLT : Post Graduate Diploma in British Literature

२)     PGDAML : Post Graduate Diploma in American Literature

३)     PGDWI : Post Graduate Diploma in Writings from India

४)     PGDWM : Post Graduate Diploma in Writings from the Margins

५)     PGDNOV : Post Graduate Diploma in the Novel

६)     PGDNLEG : Post Graduate Diploma in New Literatures in English

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ दिल्ली, प्रादेशिक केंद्र पुणे अंतर्गत चालणाऱ्या जुलै २०२४ सत्रासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व आधिक माहितीसाठी ignou.ac.in ह्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील इग्नू स्टडी सेंटर १६१०, विवेकानंद महाविद्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये (मंगळवार ते शनिवार ४ ते ७, रविवार १०:३० ते १:३०, दूरध्वनी क्रं ०२४०- २३६५८७१) संपर्क साधण्याचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी आर शेंगुळे व इग्नू समन्वयक डॉ नागनाथ तोटावाड अभ्यास केंद्र १६१० यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page