एमजीएममध्ये आयईईई’च्या ६ व्या परिषदेचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत आयईईई’च्या बॉम्बे सेक्शन सिग्नेचर कॉन्फरन्स ‘फ्रंटियर्स ऑफ टेक्नॉलॉजीस : फ्यूएलिंग प्रॉस्परिटी ऑफ दि प्लॅनेट अँड पीपल’ या संकल्पनेवर आधारित गुरूवार, दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ रोजी एमजीएम विद्यापीठात आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वाजता आर्यभट्ट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या एक दिवसीय परिषदेत डेटा अनॅलिटीक्स अँड व्हिज्युलायजेशन, ऑप्टिकल सेन्सर्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, इंटरनेट ऑफ थिंग्स, एआय अँड मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, जिओस्पेशल टेक्नॉलॉजी, कॉम्युनिकेशन इंजिनियरिंग, सस्टेनेबल पॉवर इंजिनियरिंग या विषयावर विषयतज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ही परिषद सर्वांसाठी खुली असून यामध्ये सहभागी होण्यासाठी https://ieeebombay.org/product/ibssc-2024/ या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात.
या परिषदेत आयआयटी नागपूरचे संचालक डॉ. ओ. जी. काकडे, प्रा. डॉ.माधुरी जोशी आदि मान्यवर संवाद साधणार आहेत. यावेळी एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, विभागप्रमुख डॉ. शर्वरी तामणे, डॉ सोनल देशमुख, डॉ एस घोष आदि मान्यवर उपस्थित असणार आहेत.