एमजीएममध्ये आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचे मंगळवारी होणार उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मार्फत आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग स्टूडेंट ब्रँचचे उद्घाटन मंगळवार दिनांक १९ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून ग्राइंड मास्टर मशिनच्या व्यवस्थापकीय संचालक मोहिनी केळकर, सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता तर विद्यापीठाच्या वतीने कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे, प्रा विजया अहिरे, स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे, आदित्य बक्षी, वैष्णवी चौधरी, प्रेरणा वीर व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत.
आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग ब्रँचचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाल्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुंसर शांभवी गुप्ता यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आयईईई’च्या वूमन इन इंजिनियरिंग ब्रँचच्या उद्घाटन सोहळ्यास आणि विशेष व्याख्यानासाठी सर्वांना खुला प्रवेश असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांनी केले आहे.