एमजीएम विद्यापीठात आयईईई’च्या ‘कोड ए थॉन’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ प्रथम
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठ युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयईईई’च्या स्टूडेंट ब्रँचच्या वतीने आयोजित ‘कोड ए थॉन’ या जिल्हास्तरीय स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज विद्यापीठाच्या आर्यभट सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी, अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे, प्रा विजया अहिरे, स्टुडंट ब्रँचचे प्रसाद वखरे, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
‘कोड ए थॉन’ या स्पर्धेत एकूण ४८० विद्यार्थ्यांच्या २४० संघांनी आपला सहभाग नोंदविला. अॅ्प्टिट्यूड टेस्ट, एमसीक्यू टेक्निकल क्वशन्स आणि प्रोग्रमिंग काँटेस्ट या तीन स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन संघांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ रुपयांची रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘कोड ए थॉन‘ स्पर्धेतील विजेत्या संघांची नावे :
प्रथम क्रमांक : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (सहभागी स्पर्धक : पंकज नवले, गिरीराज पारिक)
द्वितीय क्रमांक : एमजीएम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, छत्रपती संभाजीनगर (नरेंद्र जाधव, प्रियेश सहिजवाणी)
तृतीय क्रमांक : देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (अथर्व वंधारे, सागर वाघमारे)
कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ एच एच शिंदे, विभागप्रमुख डॉ शर्वरी तामणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा विजया अहिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा वीर, जान्हवी भटलवंडे तर आभार आदित्य बक्षी यांनी मानले.