एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात इंडियन असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सायकियट्री राष्ट्रीय परिषद संपन्न

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय येथे सुरू असलेल्या इंडियन असोसिएशन ऑफ प्रायव्हेट सायकियट्री या चार दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला. दिनांक २१ ते २४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान चार दिवसांमध्ये या परिषदेमध्ये पाचशेहून अधिक मनोविकार तज्ञांनी सहभाग नोंदवला. या चार दिवसांमध्ये चार प्लेनरी, आठ सह सेशन्स व १३ केस डिस्कशन्स सोबतच दोन डिबेट्स घडून आणण्यात आल्या. या सगळ्या द्वारे सर्व मनोविकार तज्ञांना मनोविकारक क्षेत्रातील भावी वाटचाली विषयी आणि विविध कठीण अशा केसेस साठी आणखीन काय करता येऊ शकते यावर मार्गदर्शन करण्यात आले.

विविध कार्यक्रमांद्वारे जनजागृती होईल असेही नियोजन झाले. प्रमुख सहभागी मध्ये डॉ मोहन आगाशे, डॉ विनू गोपाल झवर, डॉ अविनाश डिसूजा, डॉ विनय सिंग ( कॅनडा) डॉ विजय नागचा, डॉ राजेश नागपाल इत्यादींनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या सर्वा द्वारे परिषदेचा उद्देश  (रुग्णांसाठी व एकंदरीत समाजासाठी मनोविकारशास्त्रामध्ये होत असलेल्या विविध बदल आणि विविध दिशा) विचार विनिमय करुण साध्य झाला.

Advertisement

यावेळी या परिषदेचा समारोप सोहळा झाला. यामध्ये नवीन अध्यक्ष डॉ मृगेश वैष्णव यांनी येणाऱ्या दोन वर्षांमध्ये भारतातील मनोविकार तज्ञांच्या प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये कशाप्रकारे मदत केल्या जाऊ शकते, आणि कसे या संघटनेला आणखीन मजबूत करून समाज उपयोगी कार्य केले जाऊ शकते यावर मार्गदर्शन केले. या परिषदेच्या यशासाठी डॉ अरुण मरवाले, डॉ मानिक भिसे, डॉ श्रद्धा जाधव, डॉ गौरव मुरंबीकर यांच्यासोबत डॉ संजीव सावजी डॉ विनय बारहाळे, डॉ अजिज कादरी, डॉ विनय चपळगावकर, अमित टाक यांच्यासह शहरातील जवळजवळ ५० हून अधिक मनोविकार तज्ञांनी मागच्या काही महिन्यांमध्ये मेहनत घेतलेली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page