एमजीएम विद्यापीठात हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.० स्पर्धेचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.० स्पर्धेचे उद्घाटन गुरूवार, दिनांक २१ मार्च २०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

MGM GATE

या उद्घाटन सोहळ्यास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरु डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, संचालक डॉ. कपिलेश मंगल व सर्व संबंधित उपस्थित असणार आहेत. हॉस्पिटॅलिटी प्रीमियर लीग २.० मध्ये अ मॉकटेल एक्सपेडिशन, गौरमेट आर्टीसन, मॉडेल मेकिंग, सीड स्टोरी, ब्रॉउचर डिझाईनिंग आणि टूसी मुसी आदि स्पर्धांचा समावेश आहे.

या स्पर्धेत एकूण १२ संघांचा समावेश असणार असून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी विविध ८ विभागांची रचना करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजक म्हणून स्पर्धेसाठी आम्ही उत्सुक आहोत. विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतेला न्याय देत स्वतःतील प्रतिभा, नाविन्य, कौशल्य यांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक डॉ कपिलेश मंगल यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com