CSMSS मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ खो खो स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा गौरव
मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा छोट्या आणि साध्या साध्या गोष्टी करत पुढे जा – डॉ मोनिका घुगे-सानप
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने व छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय, अखिल भारतीय विद्यापीठ खो खो स्पर्धेत 2023-24 या वर्षात प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ मोनिका घुगे-सानप (सहाय्यक संचालिका, भारतीय खेल प्राधिकरण), प्रमुख पाहुणे बैजू पाटील (राष्ट्रीय खो-खो खेळाडू, आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर), समीर मुळे (व्यवस्थापकीय संचालक, अजित सिड्स प्रा लि), डॉ श्रीकांत देशमुख (प्रशासकीय अधिकारी, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था), गोविंद शर्मा (खजिनदार महाराष्ट्र खो खो असोसिएशन) हे लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ मोनिका घुगे-सानप यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की सुरुवातीला मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा छोट्या छोट्या आणि साध्या साध्या गोष्टी करत पुढे जा. यामुळे तुमच्यावर आणि कुटुंबावर त्याचा फार दबाव येणार नाही. कोणतंही काम करण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. उदाहरणार्थ जसे रोज का धावायचं याचं उत्तर शोधले, तसचं एकदम उठून दहा किलोमीटर आपण धावू शकत नाही. सुरुवातीला हवं तर एक किलोमीटर पासून सुरुवात करा. रोजच्या सरावांने हळूहळू अंतर वाढत नेल्याने तुमचा खेळ आणि आरोग्य ही चांगलं आणि सुदृढ निरोगी राहू शकेल. तुम्हाला सवय लागल्यानंतर आणि पुढे कंटाळाही येणार नाही. त्याच्यामध्ये सातत्य राहिल्यामुळे तुमच्या खेळात निश्चित प्रगती होईल आणि आयुष्यामध्ये सकारात्मक विचारही रुजवेल.
प्रमुख पाहुणे बैजू पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की एखादी गोष्ट करताना त्यात किती प्रगती होईल याची नोंद आपण सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःला प्रयत्न देणं सोपं जाईल. तुम्ही जेव्हा स्वतःची प्रगती बघाल. तेव्हा ते काम आणखी किती चांगलं करण्यासाठी प्रेरणा देणं सोपं जाईल.
समीर मुळे यांनी तुम्ही धावण्याचा अंतर आणि वेग ज्याप्रमाणे वाढ होत नेला, याची तुमच्याकडे नोंद असेल तर ते तुम्हाला रोज धावण्यासाठी आणि खेळण्यासाठी प्रेरणा देत राहील. तसेच तुम्हाला येणाऱ्या अडचणीत धावून येणार व खो खो हा खेळ उच्चस्तरावर आम्ही सर्व जण घेऊन जाऊ. असे आपल्या मनोगतात व्यक्त केले, डॉ श्रीकांत देशमुख यांनी संस्थेत आत्तापर्यंत विविध खेळात प्राविण्य प्राप्त केले. हे सांगितले खेळाचा महत्व पटवून दिले, गोविंद शर्मा यांनी मैदानावर सातत्य ठेऊन प्रामाणिक प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल हे पटवून दिले.
डॉ मोनिका घुगे सानप व बैजू पाटील यांच्या हस्ते खालील खेळाडूंना गौरविण्यात आले.
१) कार्तिक साळुंके – सुवर्णपदक १४ वर्षाखालील राष्ट्रीय खो खो स्पर्धा, टिपतूर, कर्नाटक, २) आदित्य भंगाळे – सुवर्णपदक १४ वर्षाखालील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धा, रांची, झारखंड, ३) राहुल नाईकनवरे (कर्णधार)- रौप्य पदक, अखिल भारतीय खो खो स्पर्धा, केरळ, ४) आकांक्षा क्षीरसागर – रौप्यपदक १४ वर्षाखालील खेलो इंडिया अस्मिता राष्ट्रीय खो खो स्पर्धा, जयपूर, राजस्थान, ५) दिव्या बोरसे – सुवर्णपदक, महिला गट खेलो इंडिया अस्मिता राष्ट्रीय खो खो स्पर्धा, झांसी, उत्तरप्रदेश, ६) वैष्णवी भावले, मुली गट खेलो इंडिया अस्मिता राष्ट्रीय खो खो स्पर्धा, लालबाग, मुंबई, ७) वरद कचरे – सहभाग, अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा, लोणेर, रायगड, ८) सुरज चिरमाडे – सहभाग, अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा, लोणेर, रायगड, ९) अनिकेत मालोदे – सहभाग, अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा, लोणेर, रायगड, १०) रोहित बोर्डे – सहभाग, केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्पर्धा, दिल्ली, ११) पूजा सोळंके – सहभाग, अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा, लोणेर, रायगड, १२) सोजल जाधव – सहभाग, अश्वमेध आंतर विद्यापीठ स्पर्धा, लोणेर, रायगड, १३) रुपाली वाघ – रौप्यपदक, अखिल भारतीय विद्यापीठ खो खो स्पर्धा, पुणे, महाराष्ट्र, १४) सुकन्या जाधव – रौप्यपदक, अखिल भारतीय विद्यापीठ खो खो स्पर्धा, पुणे, १५) गणेश जारवाल – तलाठी, १६) योगेश भोगे – कणक व्हेब सिरीज अभिनेता, १७) आकाश खोजे – वनविभाग.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युसूफ पठाण तसेच आभार हे विकास सूर्यवंशी यांनी मानले, या प्रसंगी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, सारिका भंडारी, भारती काकडे, मोहन अहिरे, शिवाजी गोर्डे, समर सुपेकर, श्रीपाद लोहकरे, उमेश साबळे, प्रमोद गुंड या सर्वांची उपस्थिती होती.