डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी काळे यांना मानद कर्नल पदवी
संरक्षण मंत्रालयाकडून सन्मान
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी जाहीर झाली आहे. सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा येत्या सोमवारी (दि २९ ) दुपारी १२:०० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला आहे. सदर पदवी विशिष्ट सेवा पदक मिळवले (VSM) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य, विद्या परिषदचे सदस्य तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून १९ विद्यापीठांच्या कुलगुरूंची यासाठी निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे ३४० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. प्राध्यापक डॉ कारभारी काळे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी बीसीयुडी संचालक तसेच संगणकशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत.