महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर पुनश्चर्या कार्यक्रमाचे आयोजन
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रम रचनेचा पुनर्विचार करण्यासाठी पुनश्चर्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो कुमुद शर्मा होत्या. यावेळी त्यांनी अभ्यासक्रम सुधारणेसाठी महत्त्वाची सूत्रे दिली. कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथमच शिक्षकांशी संवाद साधला. या प्रसंगी कुलगुरू प्रो कुमुद शर्मा यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाची प्रस्तावना आणि वक्तव्य अनुवाद व निर्वचन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो हनुमानप्रसाद शुक्ल यांनी दिले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी, तरतुदी आणि अभ्यासक्रम इत्यादींवर सविस्तर चर्चा केली.
गालिब सभागृहात मंगळवार, १८ मार्च रोजी आयोजित कार्यक्रमाचे संचालन व आभार कुलसचिव प्रो आनन्द पाटील यांनी केले. या वेळी विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता, निदेशक, विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते आणि सर्व क्षेत्रीय केंद्रांमधील प्राध्यापकांनी ऑनलाइन सहभाग घेतला.