महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त कुलगुरू प्रोफेसर कृष्णकुमार सिंह यांचा सत्कार

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील तुलनात्मक साहित्य विभागाचे प्रोफेसर व कार्यवाहक कुलगुरू प्रोफेसर कृष्ण कुमार सिंह शुक्रवार 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त विश्वविद्यालयाच्या वतीने अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले की विश्वविद्यालया सोबत माझी ओळख जोडली गेलेली आहे. विश्वविद्यालयाकडून स्नेह, सद्भाव आणि प्रेम मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यशाली समजतो. त्यांनी विश्वास व्यक्त केला की विश्वविद्यालय आपले उद्देश प्राप्त करण्यासाठी अग्रेसर होईल आणि यात यशस्वी सुद्धा होईल.

Advertisement

याप्रसंगी प्रोफेसर सिंह यांचा मंचावरील अतिथींच्या वतीने सुतमाळा, शाल, तुळशीचे रोप व श्रीकृष्णाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. गालीब सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो जनार्दन कुमार तिवारी, शिक्षण व प्रबंधन विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो गोपाल कृष्ण ठाकूर. मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो फरहद मलिक, वर्धा समाज कार्य संस्थानचे निदेशक, तुलनात्मक साहित्य विभागाचे प्रोफेसर हनुमान प्रसाद शुक्ल, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो दिगंबर तंगलवाड, जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रोफेसर कृपाशंकर चोबे, साहित्य विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर उमेश कुमार सिंह, क्षत्रिय केंद्र प्रयागराजचे प्रोफेसर अखिलेश कुमार दुबे, डॉ अवंतिका शुक्ला व सहायक प्रोफेसर डॉ मुन्नालाल गुप्ता तसेच विद्यार्थी अमित कुमार व शुभम तांबे यांनी प्रोफेसर कृष्णकुमार सिंग यांच्या दीर्घायु जीवनाची तसेच स्वस्थ व आनंदित राहण्याची कामना केली. सर्वांनी त्यांच्यासोबत आलेले अनुभव व्यक्त करत त्यांना एक उत्कृष्ट शिक्षक व संवेदनशील व्यक्ती संबोधले.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलित करून कुल गीताने करण्यात आला तसेच राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन तुलनात्मक साहित्य विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ रामानुज अस्थाना यांनी केले तर कुलसचिव प्रोफेसर आनंद पाटील यांनी आभार मानले. या प्रसंगी शिक्षक अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page