डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू रुग्णांना श्रवणयंत्रांचे वाटप
अमरावती | २७ डिसेंबर २०२५ : शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शिवाजीनगर, अमरावती येथे गरजू रुग्णांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रोटरी क्लब अंबानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.

दानदाते व संस्थांचे मोलाचे सहकार्य
हा उपक्रम शाह प्लास्टिक इंडस्ट्रीजचे संचालक श्री. भावीकजी सुधीरभाई शाह यांच्या आर्थिक सहकार्यामुळे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
अधिष्ठात्यांच्या हस्ते श्रवणयंत्रांचे वितरण
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांच्या शुभहस्ते गरजू रुग्णांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात दानदाते, रोटरी क्लब अंबानगरीचे पदाधिकारी तसेच कान-नाक-घसा (ENT) विभागाच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.
या उपक्रमामुळे श्रवणदोष असलेल्या अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले व भविष्यातही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला पुढील मान्यवर उपस्थित होते:
- वैद्यकीय उपअधिक्षक – डॉ. सोमेश्वर निर्मळ
- प्रशासकीय अधिकारी – डॉ. स्वप्नील मोहोड
- ENT विभाग प्रमुख – डॉ. श्रीकांत महल्ले
- डॉ. अनिल पाटील, डॉ. गिरीश तापडीया, डॉ. रवी गणेशकर, डॉ. प्रिती ठाकरे
- रोटरी अंबानगरी अध्यक्ष – रोटे नितिन गुप्ता
- माजी अध्यक्ष – रोटे प्रशांत करवा
- एन्क्लेव चेअर – रोटे नंदकिशोर राठी
- असिस्टंट गव्हर्नर – रोटे सचिन देशमुख
- रोटे उदय कालमेघ, रोटे अजय लोया, रोटे आशीष बाकोडे
- प्रकल्प प्रमुख – रोटे डॉ. ऋषिकेश नागलकर
- सेक्रेटरी प्रोजेक्ट्स – रोटे संतोष मालानी
- डॉ. ऋषिकेश सावदेकर, डॉ. गौरव भुतडा, डॉ. संजीव जयस्वाल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मंजुषा देशमुख यांनी केले, तर डॉ. गिरीश तापडीया यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
