सोलापूर विद्यापीठाच्या वतीने हर्षवर्धन विद्यालयात “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम संपन्न

हर्षवर्धन विद्यालय हिप्परगे तळे येथे सायबर चे धडे

किक हिल फॉउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” उपक्रम

हिप्परगे तळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल, क्रिक हिल फॉउंडेशन, पुणे व यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सिद्रामय्या स्वामी व उपस्थित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी.

या उपक्रमामध्ये संगणकशास्त्र संकुलातील प्रविण कोळी व सिद्रामय्या स्वामी या विद्यार्थ्यांनी “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या विषयावर सेमिनार दिले. या सेमिनार मध्ये त्यांनी आजच्या ऑनलाइन युगामध्ये होणाऱ्या विविध प्रकारच्या फसवणुकीबद्धल उदाहरणाद्वारे माहिती दिली. अश्या प्रकारच्या फसवणुकी होऊ नये म्हणून त्याबद्धल सर्वांनी काळजी घेण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

Advertisement

OTP कोणास सांगू नये, अनोळखी नंबर वरून आलेले फोन कॉल्सची पडताळणी करून घेणे, whatsapp व इतर सोशल मीडियावर आलेल्या मेसेजेस व लिंकची शहानिशा करावी व त्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी. पासवर्ड स्ट्रॉग वापरून आपली माहिती सुरक्षीत करावी तसेच आपली माहिती हि आपली जबाबदारी आहे असे सांगितले. मोबाईल, कॉम्पुटर, लॅपटॉप इत्यादी साधनावर अधिकृत अँटीव्हायरसचा वापर करावा.

या कार्यक्रमास एकूण -200 विद्यार्थी व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी, गावातील युवा वैष्णव बाचुटे, सचिन पवार, विशाल रेवजे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राऊत सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page