सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
नागपुर : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था संचालित सीताबाई नरगुंदकर नर्सिंग महिला महाविद्यालयात ७ जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि संस्थेच्या आश्रम गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीकांत चिताळे आणि श्रीकांत गाडगे हे होते. अपर्णा इंगोले यांनी गुरुपौणिमेचे महत्व सांगितले. कार्यक्रमांचे सन्माननीय अतिथी श्रीकांत चितळे सर यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये गुरु कसे महत्त्वाचे आहेत याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रूपा वर्मा यांनी आमचे आद्य गुरू धोंडो केशव कर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने उभारलेल्या अनेक मुली, विधवा आणि गरजू स्त्रिया त्यांच्या जीवनात वाढल्या यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यामध्ये गुरु-शिष्य (शिक्षक-विद्यार्थी) परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. रेणुका हिरडे यांनी गुरुपौर्णिमा बद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षेकेकत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रेश्मा राऊत यांनी केले. महाविद्यालयाचा प्राचार्या डॉ रुपा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका मंजू साळवे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
