उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात युवा कौशल्य दिनानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत युवा कौशल्य दिनानिमित्त विशारद द स्किल डेव्हलपमेंट केंद्रार्तगत कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी प्रा मुक्ता महाजन यांनी कला व कौशल्य यांचे जीवनातील महत्व विशद करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Advertisement

प्रशाळा संचालक व कौशल्य विभाग समन्वयक प्रा मधुलिका सोनवणे यांनी कौशल्य वाढीसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या कार्यक्रमांची व अभ्यासक्रमाची माहिती दिली. यावेळी डॉ आर आर चव्हाण व व्य प सदस्य डॉ पवित्रा पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋग्वेद देशमुख यांनी केले. दामिनी पाटील या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page