राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाच्या कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
ग्रामीण विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल
घोडेगाव : राजमाता जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी परम संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रा रामदास गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी, संस्थेने प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल लॅबोरेटरी उभारल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे, प्राध्यापक वर्ग नियुक्त करण्यात आला आहे, जे विद्यार्थ्यांना गुणवत्ता-पूर्ण प्रशिक्षण देतील.
या प्रशिक्षण केंद्रात पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रवेश घेतले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरली आहे. त्यांचे कौशल्य विकासाच्या या कार्यक्रमात सहभाग घेतल्यामुळे त्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील मार्गदर्शनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.