गोंडवाना विद्यापीठाचा तीन दिवसीय अमृत कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

गडचिरोली : शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामध्ये खेळांप्रती उत्साह निर्माण व्हावा, याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्नित अनुदानित महाविद्यालयातील जवळपास ३५० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी १६ ते १८ असे तीन दिवस गोंडवाना विद्यापीठ परिसरात अमृत कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठ परिसरात उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तर प्रमुख अतिथी म्हणून
उपसंचालक , क्रीडा विभाग , नागपूर , शेखर पाटील, मुजीकल मोटिव्हेशनल स्पीकर कैलाश तानकर, जेष्ठ कलावंत, नाटककार व दिग्दर्शक , विरेंद्र गणवीर , प्रमुख उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे आदी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Gondwana University GUG Gadchiroli

१८फेब्रुवारी रोजी, सकाळी १०.३० वा. या महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण होणार आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,विशेष अतिथी म्हणून जेष्ठ झाडीपट्टी नाट्य कलावंत पद्मश्री परशुराम खुणे , अर्जुन पुरस्कार (अथलेटिक्स व पावर लिफ्टिंग), भारत सरकार, विजय मुनिश्वर, प्रमुख उपस्थिती म्हणून प्र- कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या संयोजक संचालक (प्र.)क्रीडा व शारीरिक शिक्षण , डॉ. अनिता लोखंडे, संचालक विद्यार्थी विकास डॉ. प्रिया गेडाम या आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.

या क्रीडा व कला प्रकारात रंगणार स्पर्धा
क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी,रस्साखेच, रनिंग , संगीत खुर्ची, खो-खो, बॅडमिंटन अशा विविध सांधिक स्पर्धा तर कला प्रकारात एकल व समूहागित , समूह आणि एकल नृत्य, लघुनाटिका, एकपात्री या स्पर्धा होणार आहेत. कर्मचारी अशा क्रीडा व कला स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page