गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता विविध पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी (दि 29 मे) प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. तरी, जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रत्यक्ष येवून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आमुदाला चंद्रमौली यांनी केले आहे.
विविध पदवी व डिप्लोमा अभ्यासक्रम –
4 वर्ष कालावधीचे बी बी ए (फॉरेस्ट मॅनेजमेंट अँड ईको टुरीजम), बी एस सी डाटा सायन्स पदवी अभ्यासक्रम, 1 वर्ष कालावधीचे डिप्लोमा इन अकाउंट अँड ऑडीटींग, सोशल प्रोग्राम ऑन ॲडीक्शन इन रुरल कम्युनिटी (स्पार्क), डिप्लोमा इन न्यु मिडीया जर्नालिजम हा अभ्यासक्रम, तसेच 1 वर्ष कालावधीचे सर्टीफिकेट इन ट्रायबल-लॉ, सर्टीफिकेट इन सोशलवर्क अभ्यासक्रम त्यासोबतच, 6 महिने कालावधीचे सर्टीफिकेट इन पायथन, सर्टीफिकेट इन इव्हेंट अँड हॉस्पीटॅलीटी मॅनेजमेंट, सर्टीफिकेट कोर्स फॉर प्रॅक्टीसींग अकाउंट तसेच सर्टीफिकेट इन गोंडी स्पिकींग यासारखे विविध पदवी, डिप्लोमा अभ्यासक्रम आणि सर्टीफिकेट कोर्सेस आदर्श पदवी महाविद्यालयात आहेत.
त्यासोबतच, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय मान्यताप्राप्त तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 नुसार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट आणि अप्रेटींसशिप कालावधीत रु 8 हजार स्टायपेंड देणारे बी एस सी इन मार्केटींग अँड सेल्स(फार्मा अँड मेडीटेक), बी ए इन मिडीया कम्युनिकेशन, बी कॉम इन रिटेल ऑपरेशन मॅनेजमेंट आदी 4 वर्ष कालावधीचे पदवी अभ्यासक्रम आहेत.
आदर्श पदवी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये –
अप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम, व्यावसायिक कौशल्य विकास अभ्यासक्रम, महाविद्यालयाची सुसज्ज व भव्य इमारत, अनुभवी, तज्ञ व उच्च विद्याविभूषित नियमित प्राध्यापक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींकरीता विद्यापीठात वसतिगृहाची सोय, सुसज्ज ग्रंथालय व वाचन कक्षाची सोय, क्रीडा व शारीरिक शि क्षणाची सोय, कमवा व शिका योजना, रोजगार केंद्र (प्लेसमेंट सेल), आदिवासी संस्कृती व कला संवर्धन केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आरोग्य सेवा, तसेच महाविद्यालय परिसरात उपहारगृहाची सुविधा देखील उपलब्ध आहेत.
प्रवेशासंबधी तसेच अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीकरीता आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर (9404126178), सह-समन्वयक गुरुदास आडे (7498620349), प्रवीण गिरडकर (9923480525), मुकूल पराते (7447316791), विठ्ठल कोरडे (7038528558) यांच्याशी संपर्क साधावा.