क्रांतिसिंह नाना पाटील यांना देवगिरी महविद्यालयात अभिवादन

क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्सवात साजरी

छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचे क्रांतिकारक क्रांतिसिंह नाना पाटील यांचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. तसेच महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक म्हणूनही उल्लेख केला जातो. त्यांच्यावर सत्यशोधक विचारांचा प्रभाव होता. ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटीस आव्हान देण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. भूमिगत चळवळीत  त्यांचे महत्वाचे योगदान राहिले. त्यांनी युवकांची संघटना स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले.

Advertisement

प्रती सरकारचे नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळेच त्यांना क्रांतिसिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय. तसेच त्यांचे सामाजिक कार्य महत्त्वाचे होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. असे गौरव उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी याप्रसंगी काढले.

या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ अपर्णा तावरे, डॉ रवी पाटील, डॉ विष्णू पाटील, प्रा नंदकुमार गायकवाड, प्रा सुरेश लिपाने, प्रा पी जे नलावडे, प्रा बाळासाहेब निर्मळ, डॉ विजय शिंदे, गौर, उन्मेष मरवडे, टाकले, प्रबंधक डॉ दर्शना गांधी हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page