शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प वाहून कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले.

oplus_2

या प्रसंगी कुलसचिव डॉ विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ तानाजी चौगुले, क्रीडा विभागाचे संचालक डॉ शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ रामचंद्र पवार, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ जगदीश सपकाळे, डॉ सचिन पन्हाळकर, डॉ मीना पोतदार, डॉ धनश्री शिंदे, डॉ पी टी पाटील, डॉ ए एस पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com