‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन 

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि. २२ जानेवारी रोजी प. पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्र-  कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी प्रथम प. पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चंदनहार व स्वागत कक्षामध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

Greetings on the occasion of Swami Ramanand Teerth's Memorial Day in SRTMU University

 यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, उद्धव हंबर्डे, शहाजी हंबर्डे, उद्धव सातपुते, रामदास खोकले, बबन हिंगे, मोहन तेलंग यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com