डी वाय पाटील विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन
कोल्हापूर : डी वाय पाटील अभिमत विद्यापिठात शुक्रवारी (३ जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ स्नेहल शिंदे यांनी सावित्रिबाईंच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षण हेच स्त्रीच्या प्रगतीचे मध्यम आहे हे ओळखून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी घराबाहेर पाउल टाकले. आजच्या आधुनिक स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची ही सुरुवात म्हणावी लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून महिलाना स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे, समाजात त्यांचे महत्वपूर्ण स्थान निर्माण करण्याचे काम सावित्रीबाईंनी केल्याचे डॉ स्नेहल शिंदे यांनी सांगितले.
यावेळी डॉ उमाराणी जे, डॉ अमृत कुवर रायजादे, डॉ पद्मजा देसाई, मनीषा बिजापूरकर, डॉ अर्पिता पांडे -तिवारी, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, जयदीप पाटील, विनोद पंडित, सुरज वणकुंद्रे, हेमा सासने, प्रवीण चांदेकर यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.