‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीमध्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रामध्ये दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्रातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
या वेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, व्यंकट रामतीर्थे, मेघश्याम साळुंके, अधिसभा सदस्य अजय गायकवाड, युवराज पाटील, शिवाजी चांदणे, उपभियंता अरुण धाकडे, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, तुकाराम भुरके, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुंगल, शिवाजी हंबर्डे, उद्धव हंबर्डे, शिवराम लुटे, जालिंदर गायकवाड, नारायण गोरे, , विजय अचलखांब, संदीप लुटे, संजय चौदंते, नीना कांबळे, शोभा पोटफाडे, उज्वला हंबर्डे, कविता गुरधाळकर, चंद्रकला हनवते यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आयोजित रक्तदान शिबीरामध्ये प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काळबा हनवते यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजपालसिंह चिखलिकर, प्रदीप बिडला, ऋतुराज बुक्तरे, प्रा. सतिश वागरे, प्रकाश दीपके, स्वप्निल नरबाग, भिमराव सूर्यवंशी, संदीप एडके, विवेक भोसले, जयवर्धन गच्चे, सचिन पवळे, प्रकाश तारू, आठवले, शशिकांत लोहबंदे, जनार्दन गवंदे, शेख रशिद यांनी परिश्रम घेतले.