स्वारातीम विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन 

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये दि.०१ ऑगस्ट, रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी डॉ. श्रीकांत अंधारे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यनावार, रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह रवि मोहरीर, तुकाराम भुरके, संजयकुमार गाजरे, शिवराम लुटे, उद्धव हंबर्डे, केशव गव्हाळे, संतोष चव्हाण, शिवलिंग पाटील, सुनिल जाधव तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. 

Greetings on the birth anniversary of Sahityaratna Annabhau Sathe at SRTM  University Nanded

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page