CSMSS मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक – रणजीत मुळे
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था येथे संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे आणि सचिव पद्माकरकाका मुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी-सिंचन, औद्योगिक क्षेत्रातील विकासात्मक दृष्टी त्यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार आजही दिशादर्शक असल्याचं छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था अध्यक्ष रणजीत मुळे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी परंपरांना विरोध करून बंदी घातली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात संस्थेचे विश्वस्त समीर मुळे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, कृषी महाविद्यालय संचालक डॉ दत्तात्रय शेळके, दंत महाविद्यालय अधिष्ठाता डॉ लता काळे, अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉ उल्हास शिंदे, तंत्रनिकेतन महाविद्यालय प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, उपप्राचार्य आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.